ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत महाजे येथील प्रकाश कोरडे ४ क्रमांक मिळवून 2023-24 ट्रॉफीसाठी पात्र

प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

दि.३१-१०-२०२३ रोजी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा या तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर तालुका बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथे झाल्या. या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका तालुक्यातील छोट्या खेड्यातून मोलमजुरी करून घर चालवणाऱ्या कुटुंबातील महाजे गावचे श्री. दौलत कोरडे यांचे चिरंजीव प्रकाश दौलत कोरडे याची 400 मीटर धावणे या खेळासाठी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत निवडीसाठी आदर्श जिल्हा परिषद शाळा महाजे येथील क्रीडाशिक्षक श्री नामदेव जोपळे, मुख्याध्यापक संजीव निकुंभ , शिक्षक वृंद कर्मचारी तसेच आई-वडील यांचे मार्गदर्शन हे लाभदायी ठरले . ह्या निवडी पश्चात पंचक्रोशीतील मा. विधानसभा अध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ साहेब मा. श्री . हरिभाऊ महाले ग्रुप ग्रामपंचायत महाजे, शृंगार पाडा, गवळीपाडा, निचई पाडा, साद्राले गुळशी, उम्राले, करंजाली सर्व ग्रामस्थ पालक वर्ग तरुण मित्र मंडळ यांच्यात आनंदाचे वातावरण झाले व कौतुक केले. अखेर या स्पर्धेसाठी प्रकाश कोरडे यास चौथा क्रमांक मिळवून समाधान मानावे लागले .बल्लारपूर येथे आज 4 वाजता झालेल्या राज्य स्तरीय 400 मीटर धावण्याच्या अंडर 14 च्या 6 खेळाडूंच्या अंतिम सामन्यात पहिला क्रमांक मुंबई विभागाचा खेळाडू आला मात्र दुसऱ्या क्रमांकासाठी 3 खेळाडूंनी एकाच वेळी अंतिम रेषा पार केली त्यामध्ये प्रकाश कोरडे ह्या विद्यार्थाचा समावेश होता म्हणून दुसऱ्या क्रमांकासाठी 3 खेळाडूंमध्ये पुनः स्पर्धा घ्यावी लागली त्यामध्ये मात्र प्रकाश कोरडे हा विद्यार्थी दिड सेकंद मांगे राहून 3 रा म्हणजे संपूर्ण स्पर्धेत 4 था (उतेजनार्थ )क्रमांक मिळवून प्रमाणपत्र ,ट्रॉफी साठी पात्र ठरला . पहिला आलेला विद्यार्थी 1 मिनिटं 4 सेकेंड ,(दुसरा ,तिसरा ,चौथा )1 मिनिटं 6 सेकेंड नंतर 3 खेळाडूंमध्ये दुसरा 1 मिनिटं 5 सेकेंड , तिसरा 1 मिनिटं 6 सेकेंड ,चौथा प्रकाश कोरडे 1 मिनिटं 7 सेकेंड चा वेळ देऊन अस्सल टक्कर देऊन चौथा क्रमांक मिळविला .विशेष अंतिम 6 खेळाडूंमध्ये प्रकाश दौलत कोरडे हा एकमेव जिल्हा परिषदचा विद्यार्थी होता बाकी सर्व विद्यार्थी असोसियेशनचे होते . पहिला आलेला विद्यार्थी 3 वेळा national गोल्ड medyalist आहे दुसरा व तिसरा आलेला खेळाडू याना 2 राष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव होता . पुढील वाटचालीसाठी प्रकाश कोरडे यास व क्रीडा शिक्षक नामदेव जोपळेसर यांना ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.