ताज्या घडामोडी
रुकडी येथे सूरज गॅस एजन्सी इचलकरंजी यांच्यामार्फत सुरक्षा शिबिराचे आयोजन

रुकडी :- हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे सूरज गॅस एजन्सी यांच्यामार्फत मोफत सुरक्षा शिबिर डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमासाठी सूरज गॅस एजन्सी चे मालक सुनिल पारिक यांनी ग्राहकांना गॅसच्या संदर्भात माहिती दिली तसेच गॅस गळती झाली किंवा गॅस पाईप लिकिज झाल्यास घ्यावयाची दक्षता कशी करावी हे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमाला उपस्थित पोलिस पाटील कविता कांबळे ग्रामपंचायत सदस्य सुजाता कांबळे, संजय माळी, तसेच या कार्यक्रमाचे सर्व नियोजन माता रमाई फाउंडेशन चे अध्यक्ष मोहन चव्हाण यांनी केले.