चोकाक येथे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन सोहळा संपन्न

हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे हातकणंगले तालुक्यातील लोकप्रीय खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते चोकाक येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी चोकाक येथील दसरा चौक येथील दलीत वस्ती राऊंड गटर्स दहा लाख रुपये च्या पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी धैर्यशील दादांनी चोकाक गावासाठी अजुन निधी देणार असल्याचे वक्तव्य केले तसेच केंद्र शासनाच्या जलजीवन योजने अंतर्गत एक कोट सदुसष्ट हजार इतका निधी उपलब्ध करुन दिल्याने गावचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आचार संहिता लागू होण्यापूर्वी अजुन निधी उपलब्ध करून चोकाक गावासाठी देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले तसेच डॉ अविनाश बनगे यांनी देखील जास्तीत निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी केली तसेच दलीत वस्ती सुधार साठी सर्व दलीत समाजासाठी जास्तीत निधी उपलब्ध करून द्यावा तसेच गावातील रस्त्यांसाठी देखील निधी द्यावा असेही ते बोलत होते यावेळी उपस्थित डॉ अविनाश बनगे, मनोहर पाटील चेअरमन महावीर विकास सोसायाटी सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सुनिल चोकाककर, उपसरपंच अरुण व्हणाळे, सदस्य प्रवीण माळी, हर्षदकुमार कांबळे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सविता चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा माळगे, अर्चना पाटील, युवा नेते अभय बनगे, सामाजिक कार्यकर्ते अखिल चव्हाण, सुरेश चोकाककर, पांडुरंग खाडे, अभिजित माळगे, गायत्री कुंभार, युवराज नंदिवाले, मुकुंद कुंभार, रवी गायकवाड, अरविंद चव्हाण, सुभाष चोकाककर, महादेव चव्हाण, जयवंत चव्हाण, विकास चव्हाण, ओमकार ननवरे, जयसिंग ढेरे, दादासो (दादम) बुकशेटे, समीर कांबळे, अनिकेत कांबळे, जयसिंग चव्हाण, तसेच महिला वर्ग यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.