ताज्या घडामोडी
ब्रेक फेल झाल्याने बस ट्रकचा भिशन अपघात

सिन्नर प्रतिनिधी – नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटा मध्ये ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे मोठा अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे . यामध्ये ओव्हरटेक करून पुढे जात असताना अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे बस व भंगार घेऊन जात असलेला ट्रक यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. सुदैवाने बस चालकाने प्रसंगावधान सावरत बसला महामार्ग लगत असलेल्या नाल्यात वळवली बस मध्ये 40 ते 50 प्रवासी प्रवास करत होते या अपघातात बस ड्रायव्हर आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाकी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून दुसऱ्या बसणे रवाना केले.