राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा शिर्डी येथे राज्यस्तरीय मेळावा संपन्न….
मनोहर देसले [पिंपळगाव बसवंत] यासं कडून....

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा
दि:-२६ जून २०२३ रोजी शिर्डी येथील साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.संतोष निकम यांच्या अध्यक्षतेखाली, राष्ट्रीय महा सचीव श्री.रमेश देसाई व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.वैभव पाटील व संघाचे विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने राज्यस्तरीय पत्रकार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी विविध राज्यांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर मेळाव्यासाठी शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने दिसून आले.राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी यवतमाळ येथील पत्रकार संघाचे मंत्रालय स्तरावरील विभाग प्रमुख श्री.प्रफुल्ल मेश्राम यांनी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची भुमिका व कार्यक्षेत्र या विषयी माहिती सांगितली तसेच पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री.मनोहर देसले यांनी पत्रकारांनी राज्यघटनेच्या चौकटीत राहून निर्भिडपणे पत्रकारीता कशी करावी या संदर्भात माहिती दिली.या प्रसंगी लासलगाव परिक्षेत्राचे पोलीस अधिकारी मा.लाड साहेब यांनी पोलीसांविषयी आपली भूमिका मांडताना पत्रकारिता करताना जर पोलीसांना आपले मित्र केले किंवा पोलीस मित्र म्हणून जर काम केले तर कोणताही पोलीस कर्मचारी आपल्याला नक्कीच सहकार्य करेल अशी मी ग्वाही देतो असे स्पष्ट सांगितले. मेळाव्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे उपशिक्षणाधिकारी श्री.विलासराव देशमुख साहेब यांनी पत्रकाराने विशिष्ट चौकटीत न राहता बाह्यजगताचा अभ्यास करावा समाजाच्या विविध स्तरातील समस्या जाणून पिडीत घटकाला न्याय देण्यासाठी सज्ज कसे राहिले पाहिजे या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. योगेश बारहाते सर व मनोहर मेहरखांब यांनी केले असून न कळत दोन्ही मान्यवरांनी संघाचे कामकाजाची माहिती करून दिली . मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय महासचिव श्री.रमेश देसाई व प्रदेश अध्यक्ष श्री.वैभव पाटील यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली . पत्रकार संघाचे पदाधिकारी श्री.सोमनाथ मानकर, राहुल वैैैराळ, श्रीमती.रेणूताई पगारे, संतोष आढाव, भावसार महाराष्ट्र संघटक सलीम काजी अशा विविध पदाधिकारी यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ हा फक्त देशापुरता राहिला नसून संघाचे कार्यक्षेत्र हे देशाबाहेर ही काम करण्यासाठी कटिबद्ध असून त्या दिशेने वाटचाल सुरू आहे असे आवर्जून सांगितले.संघाचे राज्यातील व राज्याबाहेरील कामकाज पाहून समाधान व्यक्त केले . प्रा. योगेश बारहाते सर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले व अध्यक्षांच्या परवांनगीने कार्यक्रमाची सांगता केली.