जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड , केंद्र:-जोपूळ ता: दिंडोरी या शाळेने स्पेलिंगबी या तालुका स्तरिय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले..
मनोहर देसले सर

चिंचखेड:—तालुका स्तरीय
स्पेलिंग स्पर्धेत चिंचखेड शाळेचे यश नुकत्याच स्पेलिंगबी ह्या स्पर्धा झाल्या त्यात शाळा स्तर केंद्रस्तर व तालुकास्तर यात मोठागट सातवी आठवी या गटातून चिंचखेड शाळेतील वैष्णवी राजाराम संधान ही प्रथम क्रमांकाने विजयी झाल्याबद्दल मा.गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दिंडोरी यांच्या हस्ते ट्राफी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी जोपूळ बिटाच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम.चव्हाण मॅडम,केद्रप्रमुख दादासाहेब ठाकरे मुख्याध्यापक संजय चौधरी व मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेतील यशाबद्दल चिंचखेड येथिल सरपंच उपसरपंच सर्व सन्मानिय सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष वसर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश पाटील व सर्व सदस्य,बालाजी मित्रमंडळ शिक्षणप्रेमी नागरीक पालक यांनी आनंद व्यक्त करुन मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले.