राज्याचे अन्नपुरवठा मंत्री माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेब यांनी दिव्यांगाचा प्रश्न एका मिनिटात काढला निकाली

राज्याचे अन्नपुरवठा मंत्री माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेब यांनी दिव्यांगाचा प्रश्न एका मिनिटात काढला निकाली सिन्नर तालुका प्रहार दिव्यांग संघटना व समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिका मिळण्यासाठी.प्रहार दिव्यांग संघटना गेले पंधरा दिवसापासून येथील दिव्यांग बांधवां ची कागदपत्र जमा करून राज्याचे अन्नपुरवठा मंत्री माननीय भुजबळ साहेब यांना भेटण्यासाठी दिव्यांग प्रहार संघटना व समता परिषद यांनी भुजबळ साहेबांची भेट घेऊन दिव्यांग बांधवांची विविध प्रश्नावर एक .तास चर्चा करण्यात आली यात विविध प्रश्न निकाली काढण्यासाठी त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांशी बोलून दिव्यांग बांधवांची प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या जिल्हाधिकारी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या तसेच शिधापत्रिका दिव्यांग बांधवांना मिळण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय रमेश जी मिसाळ यांना त्वरित अंतोदय शिधापत्रिका देण्याचे आदेशित केले याप्रसंगी समता परिषदेचे जिल्हा सचिव राजेंद्र भगत तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण भाऊ पाचोरे सिन्नर तालुका उपाध्यक्ष संदीप भाऊ आव्हाड कार्याध्यक्ष नंदू भाऊ शिरसाठ सचिव भगवान पगार आधी पदाधिकारी उपस्थित होते