जैन प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
दिपक गरुड

न प्राथमिक शिक्षण मंदिर या शाळेमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रतिमापूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे पालक मंगलताई साबळे , शाळेच्या मुख्याध्यापिका लिनिता अहिरे यांनी केले. प्रसंगी बाळासाहेब पगारे उपस्थित होते.
शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत लोकमान्य टिळक तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर आधारित भाषणे केली.इयत्ता २री तील वेदांत साबळे याने लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत तर ३ री तील कार्तिक वाघचौरे याने अण्णाभाऊ साठे यांच्या वेशभूषेत येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शाळेतील उपशिक्षक गणेश महाले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी तर सतिश गाडे यांनी लोकमान्य टिळक यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका मनिषा पाटील यांनी केले तर आभार जयश्री बाविस्कर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका लिनिता अहिरे यांनी लोकमान्य टिळक यांचा फोटो शाळेसाठी सप्रेम भेट दिला.
कार्यक्रम प्रसंगी भाषणे केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.
संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलालजी ब्रम्हेचा मानद सचिव शांतीलालजी जैन, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनिलजी आब्बड जैन प्राथमिक शाळेचे अध्यक्ष महावीरजी चोपडा आयटीआय कॉलेज चे अध्यक्ष मोहनलालजी बरडिया विश्वस्त अमितजी जैन, अजयजी ब्रम्हेचा आदिंनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.