मनमाड येथील रेल्वे तलावात आढळला तरुणाचा मृतदेह
ज्ञानेश्वर पोटे

मनमाड – दिनांक 16/01/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास
श्री.दिपक बाळासाहेब दरगुडे यांना गट नंबर 425 रेल्वे तलवालगत शेतात कांदे लागवड चालु असताना तलावातून घाण, उग्र वास येत असल्याचे लक्षात आले. श्री.दिपक दरगुडे यांनी तलावाच्या दिशेने पुढे जाऊन बघितले असता, त्यांना तलावाच्या किनाऱ्याला एक मृत अवस्थेत मृतदेह बॉडी दिसली. त्यांनी लगेच मनमाड पोलीस स्टेशनला व सामाजिक कार्यकर्ते श्री.भागवत झाल्टे यांना मोबाईल फोन द्वारे माहिती दिली. श्री. झाल्टे यांनी मनमाड Dysp बाजीराव महाराज साहेबांना फोनवर सविस्तर माहिती दिली, त्या नंतर पोलीस पथक रेल्वे तलावा जवळ दाखल झाले. साधारण 4 ते 5 दिवसांपासून बॉडी पाण्यात असल्या कारणाने पूर्णपणे खराब झाली होती. त्यावेळी मदतीसाठी
एस. सी. भालके, पोलीस नाईक मैहीद, श्री.भागवत झाल्टे, श्री .दिपक दरगुडे, श्री .गणेश आहिरे यांच्या मदतीने रात्री 8 वाजेच्या सुमारास सदर मृतदेह तलावातुन अथक प्रयत्नाने बाहेर काढण्यात आला.
सदर मृतदेहाचा पोलीसांनी पंचनामा केला, त्यावेळी मयताच्या खिशातील
पॉकेट मध्ये रेल्वे टिकीट व आधार कार्ड मिळाले. आधारकार्ड वरील माहिती नुसार सदर मृतदेह
मोहम्मद जुल्फकार MP येथील व वय 24 वर्ष असल्याचे समजते .नंतर सदर मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी मनमाड येथील शासकीय रुग्णालय पाठवण्यात आला असून पुढील तपास मनमाड पोलिस करत आहेत.