ताज्या घडामोडी

सुरगाणा काठीपाडा चा विकास गेला कुठे ?आजही लोक सुविधेपासून वंचित’

कळवण प्रतिनिधी वैभव गायकवाड

 

सुरगाणा तालुक्यातील काठीपाडा या ठिकाणी अनेक समस्या उद्भवलेले असून याकडे प्रशासनाचे व अधिकाऱ्यांचे अक्षरशा दुर्लक्ष झालेले आहे या गावातील लोकांना सकाळच्या अन्नापासून संध्याकाळच्या झोपेपर्यंत दिवसभर अडचणींचा सामना करावा लागतो परंतु यांच्याकडे एकही प्रशासनाचा अधिकारी फिरकुन बघत नाही या लोकांचा गुन्हा तरी काय? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे या लोकांना राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांची आत्तापर्यंत कुठलाही निधी किंवा मदत पोहोचलेली नाही या लोकांना श्रावण बाळ योजना विधवा योजना निराधार योजना घरकुल योजना तसेच अपंगांना ग्रामपंचायत मधून मिळणारा पाच टक्के निधी सुद्धा आत्तापर्यंत मिळालेल्या नाही मग येथील ग्रामसेवक व सरपंच करतो तरी काय? या लोकांना ग्रामसेवक ची सही पाहिजे असेल तर सुरगाणा या ठिकाणी जावं लागतं तसेच या ठिकाणावरून लवकर बसेस उपलब्ध नसल्यामुळे अक्षरशः खाजगी वाहनांना लटकून प्रवास करावा लागतो असा जीव घेणा प्रवास करताना त्यांना अनेक समस्यांना तोंड देऊन प्रवास करावा लागतो या ठिकाणी जेव्हा पत्रकार बांधव गेले तेव्हा या लोकांनी आपल्या समस्येचा पाढा वाचायला सुरुवात केली या ठिकाणी पावसाळ्यामध्ये एक नदी वाहते या नदीच्या वरती फुल नसल्यामुळे त्या लोकांना पाच ते सहा किलोमीटर प्रवास करून काठीपाडा या गावांमध्ये यावा लागते ग्रामसेवक ची सही घेण्यासाठी परंतु या गावाला ग्रामसेवक उपलब्ध नसतो त्यामुळे त्या लोकांना कंपाळावरती हात मारण्याची वेळ येते. तसेच पिण्याचे पाणी रस्त्यावरती लाईट राशन आणि घरकुल या सर्व गोष्टी पासून ते वंचित आहेत आणि या गावातील लोके जर काही बोलण्यास गेले तर या गावचा पदसिद्ध व्यक्ती त्यांच्यावरती दादागिरी करतो असे लोकांचे म्हणणे आहे. या पदसिद्ध लोकांची दादागिरी इतकी वाढलेली आहे की यांच्यापुढे कोणीही बोलण्यास धजावत नाही त्यामुळे लोकांची दादागिरी वाढलेली आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या लोकांच्या जर लवकर समस्या सोडवल्या नाही तर उद्या या लोकांना फक्त आत्महत्या करण्याची वेळ शिल्लक राहिलेली आहे असे लक्षात आले. या ठिकाणी अंध अपंग वयस्कर लोकांना आत्तापर्यंत ग्रामपंचायत न कुठलाही सहकार्य करून कुठल्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही मग नेमकी ग्रामपंचायत कशासाठी हा प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण झालेला आहे?

या ठिकाणी महिला सरपंच असताना सुद्धा महिलेचा पती ग्रामपंचायत सर्व कारभार बघतो असं गावच्या लोकांचे म्हणणे आहे व ही महिला कधीही लोकांच्या समोर येऊन त्यांच्या समस्या ऐकून घेत नाही कायम तिचा पतीच सर्व कारभार बघतो त्यामुळे आम्हाला सुद्धा प्रश्न पडलेला आहे की नेमकी आम्ही मतदान केले कोणाला?

प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवडे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहे असे आम्ही ऐकले आहे तरी आम्हाला यांच्याकडून न्याय मिळावा अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो साहेब एकदा आमच्या गावाला भेट देऊन आमचे समस्या जाणून घ्यावी ही आमची आपल्याला विनंती

सुरगाणा काठीपाडा ग्रामस्थ

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.