देव तारी त्याला कोण मारी सप्तशृंगी गडाच्या ४००/५०० फूट खोलदरीत बस जाऊन सुद्धा भाविक किरकोळ जखमी व सुखरूप
सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड.

सप्तशुंगी गडाच्या घाटात ४००/५००फुट दरीत बस कोसळून एक महिलेचा मुत्यु :- व २० लोक जखमी :– उपचारा साठी काही भावीक वणी ग्रामिण व काही भाविक नाशिक रुग्णालया येथे रवाना
श्रीक्षेञ सप्तशुंगगडावरील गणपती पाॅईंट जवळील घाटात ठिकाणी दि.१२ जुलै सकाळी ६ /३० वाजेच्या दरम्यान खामगाव बुलढाणा डेपो ची एम एच ४० ए क्यु ६२५९ हि मुक्कामी असलेली राज्य परिवहन महामंडळाची बस घाटातुन खामगाव बुलढाणा या ठिकाणी जात असताना सप्तशुंगगडा पासुन पाच कि.मी अंतरावर असलेल्या घाटातील गणपती पाॅईंट जवळ चालकाचे बस वरील नियंञण सुटल्याने गणपती घाटातील यु आकारच्या वळवरील ठिकाणी ३००फुट दरीत बस कोसळून एक महिला ठार झाली असुन २० लोक व चालक वाहक सह जखमी झाले असुन या जखमीना नांदुरी सप्तशुंगगड ग्रामस्थ देवी संस्थान चे अधिकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन याच्या सहकार्याने घाटातुन जखमीना काढुन वणी येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले
आशाबाई राजेंद्र पाटील वय 55 मोढी जि. जळगाव या अमळनेर येथील महिलाचा मुत्यु झाला असुन मुडी येथील १२ ते १५ भाविक सप्तशुंगी च्या दर्शनासाठी गडावरती आले होते सदर बसने खाली जात असताना सदरचा अपघात झाला जखमी मधील 5ते6 लोकांना नाशिक येतील जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले असुन सदर जखमीवर वणी येथील रूग्णालयात उपचार चालु आहेत याबाबत माहिती समजली असता पालकमंत्री दादा भुसे हे रूग्णालयात जाऊन रूगणाची माहिती घेतली.
सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील 18 प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असतां हा अपघात झाला आहे. अशी प्रार्थमीक माहिती आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो आशी भावना पालकमंञी यांनी व्यक्त केली आहे
तसेच केन्द्रीय आरोग्य राज्यमंञी भारती पवार यांनी हि सहा जिल्हाधिकारी कळवण यांच्याशी फोन वरून याबाबत ची माहिती घेऊन संबधीत रूग्णाना उपचार व सर्व सुविधा पुरविण्यासाठी मदत करण्यासंबधी सुचना केले आहेत
यावेळेस सहा जिल्हाधिकारी विशोल नरवाडे तहसीलदार पोलीस निरीक्षक महेश निकम देवी संस्थान चे ऑम्बुलनस सह मॅनेजर ट्रस्टचे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी सप्तशुंगगड ग्रामस्थ नांदुरी ग्रामस्थांनी जखमीना मदत करून वणी येथे रूग्णालयात पाठविण्यात मदत केली
———-‘ ——–‘ ————‘
१५वर्षांपूर्वीही अशीच मुबई येथील खाजगी बसेसचा अपघात झाल्याची आठवण झाल्याने सर्वञ या घटनेची आठवण मदत करणारे सप्तशुंगगड नांदुरी येथील ग्रामस्थांना झाली त्यावेळेस हि २००फुट दरीत बस गेल्याने ४० भाविकांना आपला प्राण गमावले लागले होते हे घटनेने काळजाचा धरकाप उडाला असल्याची भावना प्रत्यक्षणी असलेल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली
____________________ ________
सप्तशुंगी च्या घाटात पाऊस सह धुके मोठया प्रमाणावर असते यासाठी पाच ते सहा कि.मी घाटात रिफलेक्टर बसविणे गरजेचे असुन संरक्षण भिती हि मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असुन संरक्षण भिती आता मुत्यु चा सपाळा बनले आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्ष व निष्काळजीपणा होत असल्याचे आरोप भाविकभक्त सह ग्रामस्थ करीत आहे.
श्री क्षेत्र सप्तशृंगी गड घाटामध्ये जो अपघात झाला त्या अपघातामुळे कदाचित जास्त ही मूर्तीची संख्या वाढू शकत होती परंतु एसटी बसचे वाहक यांनी प्रसंग सावधान राखून आपल्या स्टेरिंगवरनं हात शेवटच्या वेळेपर्यंत थोडाही बाजूला सरकू न दिल्यामुळे या अपघाता मुळें मूर्तीची संख्या कमी झाली असे म्हणायला काहीच हरकत नाही.
श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरती पावसाच्या दिवसांमध्ये दाढ धुके व पाउस असतो त्यामुळे गडावरती येणाऱ्या भाविकांना कायमच अडचणी येत असतात यामुळे या ठिकाणी शासकीय बांधकाम विभागाने रस्त्यावरती सासलेला चिखल व रस्त्याच्या साईटला असलेले पाण्यासाठी बनवलेली चारी त्वरित स्वच्छ करावी जेणेकरून रस्त्यावरती चिखल येणार नाही व अपघात होणार नाही कारण सप्तशृंगी गडावरती पाऊस चालू असतो त्यामुळे डोंगरावरील माती व दगडे रस्त्यावर पडण्याचे घटना घडत असतात त्यामुळे शासकीय बांधकाम विभागाचे कायम याकडे लक्ष असावे परंतु असे होत नाही काही वेळेस तर सप्तशृंगी गडावरील किंवा नांदुरी येथील जेसीबी घाटामध्ये आणून घाटातील दगड माती दूर करून भाविकांना रस्ता निर्माण करून द्यावा लागतो असे मत सप्तशृंगी गड व नांदुरी येथील ग्रामस्थां नि व्यक्त केले
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करोणाच्या काळामध्ये बसेस दोन वर्षे बंद असल्यामुळे सर्व बसेस कामावरती आलेल्या आहे अनेक पदाधिकारी व सामान्य जनता यांनी वेळोवेळी परिवहन मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे की सदर सर्व जुन्या झालेल्या बसेस त्वरित बंद करून नवीन बसेस उपलब्ध करून द्यावे जेणेकरून कुठल्या अपघात होणार नाही कारण चालू बसेसचा कधी ऱाॅड तुटणे कधी टायर निघून जाते अशा अनेक कारणामुळे अपघात होत आहेत आता तरी प्रशासनाला जाग येईल का ? आता तरी त्वरित नवीन बसेस उपलब्ध होतील का ? अशी अपेक्षा जनता करत आहे.
चौकट. श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या घाटामध्ये बसच्या झालेल्या अपघातामध्ये भाविकांचे विचारपूस करण्यासाठी राज्याचे पालकमंत्री दादाजी भुसे ग्रामीण ऐस पी शहाजी उमाप सहाय्यक जिल्हाधिकारी तहसीलदार शासकीय बांधकाम विभागाचे पदाधिकारी कळवण दिंडोरी वनी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अन्य विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते
बस मध्ये प्रवास करणारे भाविकांची नावे
श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या अपघात झालेल्या बसमधील भाविक आहेत
गजानन पांडुरंग टपके 39
अकोला
प्रमिलाबाई गुलाबराव बडगुजर 65.मुंडे तालुका अमळनेर
रघुनाथ बळीराम पाटील 70.राहणार भोकर जिल्हा जळगाव.
बाळु भावलाल पाटील 48.राहणार भोकर
लक्ष्मीबाई काळू गव्हाणे 40सप्तशृंगी गड
संजय बळीराम भोईर60. राहणार मुंडे
सुशील बाई सोनू बडगुजर 27.राहणार मुंडे राहणार
सुशील बाई बबनराव नजान 64.
आशाबाई वामन सूर्यवंशी 75.पचकेश्वर तालुका निफाड
वच्छलाबाई साहेबराव पाटील 65.राहणार मुंडी
यमुना रामदास गांगुर्डे.40. सप्तशृंगी गड
विमलबाई अक्रांत भोई 59.राहणार मुंडे
प्रतिभा संजय भोई.45. राहणार मुंडी
जिजाबाई साहेबराव पाटील 65.राहणार मुंडी.
ज्योती उमेश पाटील
29 खडक शिरपूर तालुका धुळे
संगीता मंगुलाल भोई
56.राहणार मुंडे
त्नाबाई. राहणार मुंडे
मनसु दगू खाटीक .68.राहणार साखरी
सुरेखाबाई हिरालाल बडगुजर राहणार मुंडी=43
. संगीता बाबुलाल. भोई 60 भोई राहणार मुंडे
भार्गबाई माधवराव पाटील 52राहणार मुंडे
मयत…अशा राजेंद्र पाटील वय 50 राहणार मुंडे तालुका अमळनेर
पुरुषोत्तम टिकार खामगाव आगार