शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा जिल्हा बँकेचा डाव – शेतकऱ्यांचा आरोप
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव वा:- नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर बोजा चढवून, भविष्यात लिलाव करत जमिनी हडपण्याचा डाव शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिला.
फडणवीस सरकारने दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली, मात्र सन २०१६ हे वर्ष टाळले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सन २०१६ ते २०१९ पर्यंतची दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली. दोन लाखाच्या वरील कर्जदारांची कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकार जाऊन मा.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आले. या सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना अनुदान वाटप जाहीर केले आहे. मात्र दोन लाखावरील कर्जमाफी बाबत अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांची म्हणवली जाणाऱ्या जिल्हा बँकेने शेतकर्यांच्या जमिनीवर बोजा चढवला आहे. त्यामुळे भविष्यात लिलाव करून गरीब शेतकर्यांच्या जमिनी हडप करण्याचा हा डाव आहे. त्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, यांच्या नेतृत्वाखाली मा.पं.स.सदस्य उत्तमराव वाघ, केशवराव जाधव, दत्तात्रय सुडके, विजय मापारी, बालकृष्ण पवार शिष्टमंडळाने याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे यांची भेट घेऊन जिल्हा बँकेचा हा डाव निदर्शनास आणून दिला. याबाबत मा.दादाजी भुसे यांना निवेदन देण्यात आले असून राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने देखील व्याज माफ करावे अशी मागणी केली. दादाजी भुसे यांनी निवेदनाची तातडीने दखल घेऊन संबधीत अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक आयोजित केली. तसेच ठेवीदारांचे पैसे देण्याबाबत याबाबत योग्य मार्ग काढून संबंधित अधिकारी व सहकार मंत्री यांच्याशी चर्चा करणार करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळ दिले.