नाशिकच्या दिंडोरी रोडवरील अकराळे फाट्याजवळ बस आणि बलेनो कारचा भीषण अपघात
ज्ञानेश्वर पोटे

दिंडोरी तालुक्यातील अकराळे फाट्याजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस आणि बलेनो कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. भर पावसात या अपघातातील दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत.
बलेनो कार ही कळवणहून नाशिकच्या दिशेने जात होती तर राज्य परिवहन महामंडळाची बस नाशिकहून कळवणच्या दिशेने जात होती. अकराळे फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाल्याने बस ने आणि बलेनो कार ने पेट घेतला. बलेनो कार मधील दोघांचा मृत्यू झाल्याची तर बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या सह दिंडोरी पोलीस घटना स्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोन्ही वाहनांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर घटनेचा पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहे.