
लासलगाव आगाराचे चालक श्री.विनोद धुमाळ राहणार गाजरवाडी तालुका निफाड यांचे काल रात्री दुर्दैवी अपघाती निधन झाले. काल संध्याकाळी विनोद धुमाळ आणि त्यांची पत्नी मोटरसायकलवर प्रवास करत असताना विनोद धुमाळ यांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला आणि त्यांची पत्नी जखमी झाल्या.त्यांच्या अचानक जाण्याने सर्व लासलगाव आगारातील कर्मचाऱ्यांवर व विनोद धुमाळ यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.आपल्या मनमिळाऊ स्वभावाने पूर्ण अधिकारी कर्मचारी आणि मित्र परिवारात विनोद यांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली होती.त्यांच्या परिवारात पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि एक भाऊ आहे.लासलगांव आगाराच्या सर्व कर्मचारी व अधिकार्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.