
साडेतीन शक्तीपिठापैकी अद्य शक्तीपिठ असलेल्या व पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गड हे उंच डोंगर-दरीत वसलेले ठिकाण आहे. श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाला ‘बंद,’ दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणी विकास कामाचे ओघ वाढत चालला आहे त्याचप्रमाणें सप्तशृंग गड येथे विविध राज्यातुन तथा देशातुन वार्षिक सुमारे लाखो भाविक पर्यटक महाराष्ट्र सह बाहेर देशातून भेट देत असतात त्यातच वर्षातील दोन यात्रा म्हणजेच चैत्र व नवरात्र उत्सव दरम्यान लाखो भाविकांची उपस्थिती ही श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरती असते त्यात सप्तशृंग गड येथील स्थानिक लोकसंख्या सुमारे ३५०० इतकी आहे. सप्तशृंग गड येथे पावसाळ्यात चारही महीणे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे सप्तशृंग गड येथे स्थानिक ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी मोठ्या समस्या निर्माण होतात. तसेच येणारे भाविकां मयत झाल्यास त्यांनाही सप्तशृंग गड येथेच अंतिविधी करण्याची इच्छा होत असते. त्यामुळे सप्तशृंग गड येथे सुसज्ज स्मशानभुमी होणे गरजेचे असल्याने तसेच सप्तशृंग गड गावात प्रवेश करतांना भव्य दिव्य अशी स्वागत कमान होणे ही भाविकांची व ग्रामस्थांची इच्छा होती तरी सदर स्वागत कमान झाल्यास सप्तशृंग गडाचे सौंदर्यात भर पडेल. तसेच नांदुरी से सप्तशृंग गड घाट रस्ता आहे व नांदुरी ते सप्तशृंग गड पायी रस्त्याने यात्रेमध्ये लाखेच्या संख्येने भाविक यात्रा कालावधी दरम्यान दर्शनसाठी पायी येत असतात. सदर दोन्ही मार्गावर रात्रीचे वेळी संपुर्ण अंधार असतो, त्यामुळे दोन्ही मार्गावर तसेच गावांतर्गत ठिकाणी सौर पथदिप बसविणे गरजेचे असल्याने अशी भाविकांची तथा ग्रामस्थांची मागणी होती या सर्वाचा विचार करून ग्रामसभेमध्ये व स्थानिक ग्रामपंचायत मिटिंग मध्ये वारंवार हा विषय उचलण्यात आला व सदर प्रश्नांविषयी ग्रामपंचायत ने वेळोवेळी पत्रव्यवहार सुद्धा केले व या सर्वाचे गांभीर्य घेत श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त दीपक पाटोदकर तथा श्री सप्तशृंग गड ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, तथा ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामस्थ यांनी वेळोवेळी स्थानिक आमदार श्री नितीन पवार यांना वेळोवेळी मागणी केली असता मा. विधान परिषद आमदार सौ.उमा खापरे याच्यां माध्यमातून श्री क्षेत्र सप्तशृंग गड येथे महाराष्ट्र शासन प्रादेशिक पयॅटन विकास अंतर्गत भव्य दिव्य स्मशान भुमी बांधकाम करणे व गावात प्रवेश करताना भव्यदिव्य कमान तसेच सौर पथ दिवे ह्या कामासाठी निधी मजुंरी दिली. याकरिता ग्रामपंचायत सतत पाठपुरावा व मा. विधितज्ञ तथा श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ऍड.श्री. दिपकजी पाटोदकर व मा. रोहिनीताई नायडू मा. शहर अध्यक्षा भा.ज.पा. नाशिक यांचे विशेष योगदान लाभले. त्याबद्दल सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ सप्तशृंग गड यांचे कडून आभार मानले जात आहेत.