ताज्या घडामोडी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे इयत्ता पहिलीच्या वर्गात नव्याने दाखल होणाऱ्या चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- जिल्हा परिषद भाटगांव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे नवीन शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी नवीन मुलांचा प्रवेश समारंभ केंद्रप्रमुख श्री.ठोके सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.मुलांचे वजन व उंची घेण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर,श्री.पवार सर,श्री.गवळी सर,सौ.बच्छाव मॅडम,सौ.गायकवाड मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रवींद्र पोटे,श्री.अनिल पोटे,श्री.संदीप पोटे,ह. भ. प. श्री.शास्त्री महाराज पोटे, श्री.सुरेश काका पाटील,सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व विद्यार्थी पालक प्रवेश समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.