डॉक्टर्स असोसिएशनची लासलगाव महाविद्यालयास सदिच्छा भेट

येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनची सदिच्छा भेट संपन्न झाली.
लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर संगीता सुरसे, डॉक्टर अरुण काळे, डॉक्टर रायते, डॉक्टर कैलास पाटील, डॉक्टर सुरेश दरेकर, डॉक्टर सुजित गुंजाळ
तसेच इतर सर्व डॉक्टर्स असोसिएशनचे डॉक्टर्स याप्रसंगी उपस्थित होते.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या वतीने याप्रसंगी पूजन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लासलगाव सारख्या ठिकाणी अद्यावत शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लासलगाव महाविद्यालय सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे असे उद्गार डॉक्टर सुजित गुंजाळ यांनी केले. तसेच लासलगाव महाविद्यालयाचे प्रशस्त ग्रंथालय, वाचनालय कक्ष व सुसज्ज अशा प्रयोगशाळा यामुळे विद्यार्थ्यांना नाशिक सारख्या ठिकाणी जाऊन मिळणाऱ्या सुविधा आज लासलगाव सारख्या ग्रामीण भागात मिळू लागल्या आहेत. डॉक्टर अरुण काळे यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना एकूणच महाविद्यालयाच्या विकासाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर संगीता सुरसे यांनी देखील आपल्या मनोगतातून लासलगाव महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा, शिक्षणासाठी असलेले अत्याधुनिक संसाधने तसेच शिक्षणासाठी असलेले अनुकूल वातावरण व अनुभवी प्राध्यापक वर्ग याबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेची जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे व प्रा. भूषण हिरे, पर्यवेक्षक उज्वल शेलार, किशोर गोसावी, सुभाष रोटे यासह इतर सर्व प्राध्यापक मित्र व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा. भूषण हिरे, डॉ. सोमनाथ आरोटे यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी श्री सुनील गायकर यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किशोर गोसावी यांनी केले तर आभार उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री उज्वल शेलार यांनी मानले.