
महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एसटीच्या तिकिटात 50 % भरगोस सवलत दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय स्तुत्य असून महिलान कडून आनंद व्यक्त होत आहे.
महिलांचा सन्मान करणारा हा निर्णय आहे,प्रथमच महिला वर्गाला 50 %एसटी तिकिटात सवलत शासनाने दिली आहे.
त्यामुळे सर्व स्तरातील महिलांकडून व सर्व सामान्य जनतेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त होत आहे.
अर्थ संकल्पात तरतूद करून घोषणा झाली व त्वरित त्यावर अंमलबजावणी आज दिनांक 17 मार्च रोजी रुजू करण्यात आली आहे
खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचे हे सरकार आहे.
आज ही प्रत्यक्षात सवलतीची अंमलबजावणी लासलगाव बस स्थानकांमध्ये शिवसेना निफाड तालुकाप्रमुख प्रकाश पाटील पिंपळस चे माजी सरपंच बबनराव ठोंबरे यांच्या उपस्थितीत महिलांना सवलतीचे तिकीट देऊन सुरुवात करताना उपस्थित एसटी वाहक सुरेश पठारे,चालक सुनील गवळी,वाहतूक नियंत्रक अनंता नेटारे, प्रवासी महिला भगिनी, प्रवासी बांधव व एसटी कर्मचारी उपस्थित होते.