लासलगाव महाविद्यालयात नक्षत्र ‘लेखन कौशल्य कार्यशाळा ’संपन्न

लासलगाव – येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळातर्फे ‘नक्षत्र’ या नियतकालिकासाठी कथा, कविता व लेखन कार्यशाळा संपन्न झाली. सुप्रसिद्ध कवी व गीतकार प्रकाश होळकर, प्रा. डॉ. अरुण ठोके प्रा. किशोर गोसावी यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कवी प्रकाश होळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचन निरीक्षणातून कविता कशी सुचते याचे उदाहरण देताना त्यांच्या ‘कोरडे नक्षत्र’ काव्यसंग्रहातील कविता ऐकवत काही कवितांचा जन्म कसा झाला याची अतिशय समर्पक शब्दात माहिती दिली. प्रा. डॉ. अरुण ठोके यांनी लेखन करण्यासाठीची आवश्यक सूत्रे सांगत आपल्या अवतीभवती अनेक विषय असतात, आपण त्या दृष्टीने लेखन करायला हवे असे सांगितले. प्रा. किशोर गोसावी यांनी ग्रामीण भागात लिखाणासाठी किती विषय असु शकतात व त्यासाठी निरीक्षणशक्ती कशी वाढवावी याबाबत माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय प्रा. कवी गुरुदेव गांगुर्डे यांनी करून दिला. उपप्राचार्य व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. भूषण हिरे यांनी प्रास्ताविक केले. नक्षत्र चे संपादक डॉ. प्रणव खोचे यांनी कार्याशाळे मागील भूमिका विशद केली. या कार्यशाळेसाठी नू.वि.प्र.मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर गोसावी यांनी केले आभार प्रदर्शन प्रा. दीपाली कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी डॉ. संजय निकम, डॉ. विलास खैरनार, डॉ.दत्तात्रय घोटेकर, प्रा. किशोर अंकुळेकर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.