भाटगांव(चांदवड) येथे आजपासून ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात
प्रतिनिधी ज्ञानेश्वर पोटे

सर्व पंचक्रोशीतील भाविक परमार्थ प्रेमी धर्मानुरागी मायबाप बंधू भगिनींना कळविण्यात आनंद वाटतो की, सालाबादाप्रमाणे याही वर्षी समस्त,ग्रामस्थ भजनी मंडळ,तरुण मित्र मंडळ भाटगांव यांच्या सहकार्यांनी ह.भ.प.नारायण महाराज ठाकरे (सोनी सांगवी) यांच्या कृपाशीर्वादाने तसेच ह.भ.प.तुकाराम महाराज निकम (परसुल)यांच्या शुभ प्रेरणेने व ह.भ.प.मधुकर जी महाराज जाधव (जोपुळकर)यांच्या कुशल मार्गदर्शनाने ३९व्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आजपासून आयोजन केले आहे. याप्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत संत महात्मे निमंत्रित करून त्यांचे प्रवचन व किर्तन सेवा आयोजित केली आहे. याप्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार भाटगांवचे वैभव ह.भ.प. श्री वैभव महाराज मोरे भाटगांवकर यांचे काल्याचे किर्तन सेवा आहे.तरी या सुवर्णसंधीचा व ज्ञान अमृताचा सर्व अबाल वृद्धांनी,रसिक श्रोत्यांनी अवश्य लाभ घ्यावा ही सप्ताह कमिटीतर्फे विनंती.तसेच याप्रसंगी कलश पूजन ह.भ.प.तुकाराम महाराज निकम (परसुल), ह.भ.प. माधव महाराज शिंदे, ह.भ.प.मधुकरजी महाराज जाधव, ह.भ.प.शिवाजी महाराज वाघ, विना पूजन ग्रामगुरू सुरेश काका कुलकर्णी भाटगांव, ह.भ.प.हरिभाऊ रामभाऊ मोरे ह.भ.प.म्हसू काका पोटे, ह.भ.प. पुंडलिक मुरलीधर मोरे,ह.भ.प. परसराम महाराज सोमवंशी, ह.भ.प.दिलीप महाराज गवळी, ह.भ.प.भिका दादा जाधव (चिंचोले), आणि ध्वज पूजन ह.भ.प.आचार्य महेंद्रजी कुलकर्णी (भाटगांव), ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे (विश्वस्त संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर संस्थान त्रंबकेश्वर)ह.भ.प.माधव महाराज कवात, तसेच व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प.नामदेव महाराज पोटे, ह. भ.प.वाळू फकीरा पोटे, ह.भ.प.वैभव महाराज मोरे, ह.भ.प.धनंजय महाराज मोरे यांच्याकडे आहे.