ताज्या घडामोडी

जळगावात बुरखा घालून मुलाच्या मारेकार्यांना संपविण्यास आलेल्या बाप शहर पोलिसांच्या ताब्यात 

मुख्य संपादक राहुल वैराळ

 

जळगाव: नशिराबाद येतो आपल्या मुलाच्या खुन करणाऱ्या थेट कोर्टाच्या आवारात गोळ्या घालून खून करण्याच्या प्रयत्न आज उधळण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी नशिराबाद जवळ्याच्या उडान पुलाच्या खाली भीषण सत्या झाली होती. या तुरुंगातून सुटलेल्या मुलाला दुचाकी वर घरी घेऊन येणाऱ्या बाप या दोघांवर हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या. यात हल्लेखोरांनी गोळीबारासह चॉपरचा हल्ला करुन धाम्माप्रिया मनोहर सुळकर याला ठार केले. तर त्याचे वडील मनोहर सुरळकर हे गंभीर जखमी झाले होते. या कोणाला पूर्व वैमनस्याची किनार होती. धाम्माप्रिया सुरळकर हा भुसावळ ११ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या मोहम्मद शेख शाकीर याच्या खून खटल्यातील आरोपी होता. तो ११ महिन्यापासून कारागृहात होता. तो कारागृहात गेल्यापासूनच मयत मोहम्मद कैफचे भाऊ व वडील बदल्याच्या भावनेत जळत होते. अखेर जामीन मिळताच त्याच्या दिवशी हल्ला करून धाम्माप्रिया संपविण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणी शेख समीर उर्फ भांजा शेख झाकीर (वय-२१) दोन्ही रा. पंचशीलनगर भुसावळ या दोघांना अटक करण्यात आली होती. अटक झाल्यापासून कारागृहा होते. आज या खटल्याची तारीख असुन त्यांना सकाळी समारे अकराच्या सुमारास कोर्टात आणणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान या प्रकरणात मयत धाम्माप्रियाचे वडील मनोहर खैरनार हे सुडाच्या आगीत जळत होते. त्यांनी आपल्या मुलाच्या खुणाच्या बदला घेण्यासाठी थेट कोर्टाच्या आवारातच दोन्ही आरोपींवर गोळीबार करून त्यांना संपविण्याचा कट रचला. यासाठी तो सुरेश रवी इंधाटे यांच्यासह कोर्टाच्या परिसरात दबा धरून बसला. मनोहर खैरनार आणि सुरेश इंधाटे हे दोन्ही बुर्का घालून मुस्लिम महिलांच्या पेहरावात कोर्टात परिसरात मंदिराजवळ बसले होते. एका खबऱ्याला संशय आला. त्याने याबाबतची माहिती शहर पोलीस स्थानकाला दिला. यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तेजस मराठे, योगेश ईंधाटे, गजानन बडगुजर, उमेश भांडारकर, शहर वाहतूकच शाखेचे परमेश्वर जाधव, यांनी धाडसी कारवाई करत पथकाने दोघांना अटक केली. याप्रसंगी झालेल्या झटापटीत मनोहर खैरनार याला अटक करण्यात आली. सुरेश रवी इंधाटे याने तेथुन प्लायन केले. खैरनार ची झळती घेतली असता त्याच्याकडे पर्स आढळून आली. यात एक गावठी पिस्तूल आणि पाच जीवन काडतुस आढळून आले. आपण आपल्या मुलाच्या बदला घेण्यासाठी येथे आलो असल्याची कबुली मनोहर खैरनार दिली आहे. अर्थात शहर पोलिसांचे पथकामुळे त्याच्या डाव उधळून लावण्यात आला या प्रसंग सहायक पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन चौकशीला सुरुवात केली आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.