ताज्या घडामोडी

एका महिन्यात दोन घटना रापली गेट नंबर 112/256/11 ते 13 जवळ पहाटेच्या सुमारास रेल्वेतून पडून एका तरुणाचा मृत्यू…

ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- चांदवड तालुक्यातील रेल्वे हद्द गेट नंबर ११२/२५६/११ ते १३ रापली रेल्वेगेट परिसरात देवगिरी एक्सप्रेस मनमाड रेल्वेमार्गावर गुरूवार. दिनांक.11 जुलै पहाटे 3 वाजता धावत्या रेल्वेतून पडून सचिन कैलास हजारे नामक तरूण (वय 21) राहणार मुदलवाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर (औरंगाबाद) येथील तरुण मृत्यू झाल्याची खबर मनमाड रेल्वे उपस्टेशन मास्तर K.P. प्रधान यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्यानंतर घटना स्थळी तातडीने हवालदार अशोक पवार,हवालदार नाना सुर्यवंशी,पोलीस नाईक चित्ते, चौधरी आदींनी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणी साठी चांदवड उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.चांदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चित्ते हे करीत आहेत. चांदवड पोलीस स्टेशनचे हवालदार कैलास पवार यांनी मृतदेह ॲम्बुलन्स मध्ये चांदवड शासकीय रुग्णालय येथे आणण्यात आला.सदर घटनास्थळ परिसरात वारंवार रेल्वे दरवाजातून व्यक्ती पडून मृत्युमुखी पडत असल्याचे दिसत आहे.सर्व रेल्वे आर पी एफ व रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे.याला कारणीभूत प्रशासन आहे,कारण रेल्वेच्या एसी कोच वाढवून जनरल व स्लीपर कोच कमी केल्याचे हे परिणाम आहे,कारण स्लीपर कोचचे हाल हे जनरल पेक्षा भयानक झाल्याचे निदर्शनास येते, त्यामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा होत नाही,गर्दी मुळे आर पी एफ व टीसी सुद्धा बोगीत प्रवेश करायला तयार नसतो कुठेतरी याचा विचार व्हायला हवा.

कोणी दरवाजात बसत असेल तर त्याच्यावरती रीतसर कारवाई करण्यात यावी अशी माहिती, सामाजिक कार्यकर्ते चांदवड तालुका प्रतिनिधी, श्री.भागवत झाल्टे यांनी रेल्वे आरपीएफ यांना दिली. सदर घटनास्थळी श्री. भागवत झाल्टे,विकास गोजरे, एक्स आर्मी मॅन दत्तू पगार, गोरख चव्हाण यांनी मदत कार्य केले.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.