मेंढी ते पंचाळे रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करण्याबाबत आज सिन्नर उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग कापडी साहेब यांना निवेदन देण्यात आले
संपादक सोमनाथ मानकर

पंचाळे ते मेंढी या आठ किलोमीटर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आमदार खासदार यांनीही कोणत्याही प्रकारची दाखल घेतलेली नाही मेंढी, पंचाळे या लोकांना पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागते शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अवघड असते. साधारणपणे ४० वर्षांपूर्वी तयार झालेल्या रस्त्यावर एक किलोमीटर अंतर वगळता कुठेही डांबर पडलेले नाही साधा मुरुमही टाकण्यात आला नाही. त्यामुळे रस्ता वाहतुकी योग्य राहिला नाही. पंचाळे, मेंढी, धनगरवाडी, शिंदेवाडी, शहा आदी सहा ते सात गावांना सर्वांत जवळचा मार्ग म्हणून या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. मात्र हा रस्ता कायम दुर्लक्षित राहिल्याची बाब दिसून येत पंचाळे, बाजारपेठेत शेतीमाल विक्रीसाठी नेताना शेतकऱ्यांनाही अडचण होते. त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा करावी अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आशा इशारा प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आला यावेळेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे उपजिल्हाप्रमुख किशोर शिंदे
कमलाकर शेलार प्रहार कामगार उपजिल्हाध्यक्ष कैलास दातीर प्रहार तालुका अध्यक्ष सिन्नर विलास खैरनार प्रहार युवा तालुका अध्यक्ष सिन्नर वैशाली अनवट महिला आघाडी तालुकाध्यक्षा अरुण पाचोरे अपंग तालुका अध्यक्ष सिन्नर सुनिल जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते