
नाशिक जिल्ह्यातील वावी ते शहा हा जोड रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सहा कोटी रुपये खर्च करून बनविला ,परंतु एकाच महिन्यात त्या रस्त्याची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ महिनाभरापूर्वी या रस्त्याचे काम सहा कोटी एकेचाळीस हजार रुपये खर्च करून पूर्ण झाले .त्यानंतर लगेचच महिन्याभरात रस्त्याला खड्डे पडले आणि डांबरीकरणाचा थर हाताने उखडून निघत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी ते शहा गावांना जोडणाऱ्या रस्त्याची गुणवत्ता उघड झाल्यामुळे कामावर नियंत्रण ठेवणारा बांधकाम विभाग आणि ठेकेदार याची चौकशी करावी. रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली .असून महिनाभरातच रस्त्याची दुरव्यस्था झाल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.