शिवकालीन स्वसंरक्षणशिबिरास म.वि.प्र.सरचिटणीस अॅड.श्री.नितीनजी ठाकरे साहेब यांची भेट
प्रतिनिधि-दिपक गरूड

वेळापूर येथील प्रताप शिव बहुउद्देशीय संस्था,शिवप्रताप कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ यांच्या विद्यमाने गावात शिवकालीन मर्दानी खेळ व स्वसंरक्षण शिबिर आयोजित केले आहे, या शिबिरास म.वि.प्र. सरचिटणीस मा.अँड.श्री.नितीनजी ठाकरे साहेब यांनी भेट देऊन शिबिरार्थींचे कौतुक केले.सदर प्रसंगी श्री.ठाकरे साहेब यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास हार घालून शस्त्र पूजा केली.
अॅड.श्री.केशव शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात शिवकालीन संरक्षण शिबिर गावागावात,जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात कसे गरजेचे आहे याचे महत्त्व मुंबईतील ताज हॉटेल मधील अतिरेकी हल्ला हैदराबाद मधील कांड व इतर घटनांची माहिती देऊन पटवून दिले ,तो धागा पकडून म.वि.प्र.चे सरचिटणीस श्री ठाकरे साहेब यांनी शिवकालीन स्वसंरक्षण शिबिर मविप्र च्या शाळांमध्ये घेता येतील यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली, सदर प्रसंगी निफाड वकील संघाचे अध्यक्ष श्री.प्रवीणजी ठाकरे अॅड.संदीप शिंदे अॅड.अजिंक्य तासकर अॅड.श्रीकांत रायते अॅड.श्रीराज ठाकरे अॅड.अभिजीत जंगम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ,याप्रसंगी सरपंच श्री.नारायण पालवे ,श्री.केशव शिंदे श्री.केदुजी शिंदे श्री.बाजीराव शिंदे श्री.राजेंद्र भागवत श्री.गणेश ठाकरे श्री.मंगेश शिंदे श्री.डि के शिंदे श्री.नंदलाल ठाकरे म्हसू कुटे ,लक्ष्मण कुटे शिबिराचे प्रशिक्षक श्री.नलावडे सर श्री.गुजराती सर श्री.लखन पवार सर आदी ग्रामस्थ व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन शेलार सर यांनी केले.