अजित पवार यांच्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीने धर्मवीर संभाजी राजे महाराज यांच्याबद्दल अविवेंकी वक्तव्य करणे अशोभनीय……सौं सुवर्णा जगताप
मुख्य संपादक राहुल वैराळ

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी बोलत असतांना ते कधी धर्मवीर नव्हते असे चुकीचे वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण राज्यात अजित पवार यांच्या विधानावरून राज्याचे राजकारण अतिशय तापलेले आहे. अजित पवार यांच्या विरोधात भाजपच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने आणि निषेध नोंदविला जात आहे. अजित पवार यांच्या विरोधात आज राज्यात भाजपा लासलगाव मंडल च्या वतीने विंचूर चौफुली येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, माफी मागा माफी मागा, होश में आओ होश में आओ,अजित पवार यांचा निषेध असो…अशा घोषणा देत आंदोलन केले व विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा अजित पवार यांनी द्यावा अशी मागणीच थेट भारतीय जनता पक्ष नाशिक जिल्हा ग्रामीण, महिला मोर्चा, युवा मोर्चा,लासलगाव मांडलाच्या वतिने केली गेली.भाजपच्या नाशिक जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुवर्णा जगताप आणि भाजपा ओबीसी सेल नेते कैलास सोनवणे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मंडल महिला अध्यक्षा स्मिता कुलकर्णी,सरचिटणीस निलेश सालकडे, किरण कुलकर्णी,काका दरेकर, नवनाथ संभेराव, पांडुरंग शिरसाठ,ओम शेवाळे,जैन प्रकोष्ट अध्यक्ष मनीष चोपडा,शहराध्यक्ष ज्ञानेश्वर देसले,बापू दरेकर, गोरख गांगुर्डे, अभिषेक घोटेकर, गंगाधर गोरे बाळासाहेब नेवगे, स्वाती जोशी,शैलजा भावसार, मनीषा हरळे,सचीन शिंदे,साहेबराव खलसे,संजय गडाख,गोरख सोनवणे, सुनील नेवगे, सोनू आब्बड, ज्ञानेश्वर शिरसाठ,भारती महाले,रेखा महाले,निर्मला साळवे, मंजाबाई देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.