
कोटमगाव येथे कृषी विभागाच्या वतीने वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली अतिवृष्टीमुळे ओढे व नाल्यांमधील उपलब्ध पाण्याचा प्रवाह अडवून पाणी जिरवण्यासाठी वनराई बंधारे उभारण्याची कृषी विभागाने मोहीम हाती घेतली आहे तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कृषी सहाय्यक प्रत्येक गावात जाऊन काम करत आहे वनराई बंदरा हा बांधकामाचा एक कच्चा व तात्पुरता प्रकार आहे सिमेंटची रिकामी पोती माती वाळू व दगडाच्या साह्याने याचे बांधकाम करता येते हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो त्याचबरोबर बिगर पावसाळी क्षेत्रासाठी काही प्रमाणात उपयोगी येतो रब्बी हंगामासाठी पिकांना व पशुपक्ष्यांसाठी पाणी साठा म्हणून याचा वापर होतो ज्या ठिकाणी वनराई बंधारे बांधले.
जातील त्या ठिकाणी त्या भागातील जमिनीत पाण्याचे प्रमाण व ओलावा टिकून राहतो तसेच जलसंधारण नास मदत होते याचा फायदा शेतकरी वर्गांना होतो या गावांत कृषी सहाय्यक श्रीमती सविता बी अहिरे कृषी सहाय्यक लासलगाव श्रीमती सुरेखा माळी कृषी सहाय्यक खानगाव नाजीक यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून वनराई बंदराचे काम पूर्ण केले या कामी गावातील लोक एकत्र येऊन आपल्या घरून सिमेंटच्या रिकाम्या गोण्या आणून त्यात वाळू येथे भरून बंदरा उभारला याप्रसंगी श्री शांताराम पगारे श्री गणपत गुरगुडे श्री मच्छिंद्र भालेराव श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे चि कृष्णा गांगुर्डे पत्रकार श्री ज्ञानेश्वर भवर हे उपस्थित होते