
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करुन समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत करणारे महामानव डॉ.आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार अनेक वर्षे आणि यापूढेही सतत प्रेरणा देत राहतील असे विचार सरपंच श्री नारायण पालवे यांनी मांडले. यांच्यासह श्री. मधुकर गरुड श्री.बाळू गरुड श्री.सुनील गरुड श्री.रोशन नवले श्री.गणेश गरुड श्री.विलास गरुड श्री.किशोर गरुड श्री.भाऊराव गरुड श्री. विश्वनाथ पारखे या सह समाज बांधव उपस्थित होते.