संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल ची क्रीडा महोत्सवाची मोठ्या दिमाखात सुरुवात.
मुख्य संपादक राहुल वैराळ

मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर ,रोजी लासलगाव येथील संस्कार इंग्लिश मिडीयम या शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सवा ची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9.30 वाजता झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे संस्थापिका सौ. मनीषा दीदी होळकर सौ.नंदा दीदी डमरे व सौ.रश्मी दीदी दगडे यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून लासलगाव चे प्रसिद्ध न्यायभूमी न्यूज चॅनल चे पत्रकार तसेच उपसंपादक श्री.अनिलजी भावसार सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेचे क्रीडाशिक्षक श्री.असीम शेख सर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले तर शाळेच्या संस्थापिका यांचे स्वागत सहशिक्षिका सुरेखा भावसार मॅडम,दिपाली नाईक मॅडम व
तनुजा मोरे मॅडम यांनी केली शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी कुशारे मॅडम यांचे स्वागत सौ.रोहिणी बोरसे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री. भावसार सर यांनी लाल फित कापून केले.दीप प्रज्वलन करून विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजून उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.👍🏻
तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक श्री .असीम शेख सर यांनी एकाग्रता ,कष्ट व निष्ठा या तीन गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील हिमालय सर करू शकता असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर कवायती सादर करून पाहुण्यांचे मनोरंजन केले.त्याबद्दल शाळेच्या संस्थापिका व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मंचावरील मान्यवर, प्रमुख पाहुणे शिक्षक वृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे श्री.असीम सर यांनी आभार व्यक्त केले