
उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्ह्यात नवोदय परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या तडवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श कन्या शाळा येथील ग्रंथालयास गावातील शाळेस स्व.गोपाळराव पाटील ग्राम प्रबोधिनी यांच्या वतीने निवडक साहित्यकृती पुस्तकांची भेट देण्यात आली.उपसरपंच व जिल्हा परिषद सदस्य शहाजी नाना वाघ, सरपंच किरण आवटे,माजी उपसरपंच तुळशीदास जमाले, यांच्या शुभ हस्ते ही साहित्यकृतींची भेट देण्यात आली . यावेळी ग्रामपंचायत सदस्य विशाल जमाले,प्रा डॉ विनोद शिंपले, सिने अभिनेते सोमनाथ तडवळकर,पत्रकार भागवत शिंदे,मारुती लोंढे, पांडुरंग विभुते, प्रा विशाल नाईकनवरे, अमजद शेख ,हारुण कोरबू, बालाजी गावकरे, बालाजी जमाले,प्रदीप नाईकनवरे,अनिल सुतार, बाळासाहेब जमाले, अनिल शिरसागर ,प्रताप करंजकर, पत्रकार विकास उबाळे, सिद्धेश्वर सुरवसे ,कपिल पाटील ,मंगेश पाटील, राजाभाऊ कोरडे ,विश्वास धनके यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी कन्या शाळेचे मुख्याध्यापक रहमान सय्यद सर ,आदर्श शिक्षक जगन्नाथ धायगुडे सर,यांनी ग्रंथालयाच्या वतीने ही भेट स्वीकारली .यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री सय्यद यांनी ग्रामस्थांच्या सहभागाने या शाळेचे आदर्श शाळेत रूपांतर झाले आहे असे प्रतिपादन केले .ही शाळा अजून मोठ्या नावा रूपास रूपाला येईल आणि यापेक्षा जास्त गुणवत्ता पूर्ण निकाल देईल अशी अपेक्षा श्री जगन्नाथ धायगुडे सर यांनी व्यक्त केली. प्रा नरहरी पाटील यांनी उपस्थित सर्व मित्र प्रेमींचे व नागरिकांचे आभार व्यक्त केले.