शिक्षकांनी विद्यार्थी, पालक, सहकारी व वरिष्ठांशी मित्रत्वाच्या नात्याने वर्तन केले पाहिजे -डॉ.बी.एम.हिर्डेकर

रुकडी दि. २३-१-२०२४ महाविद्यालयीन शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा काळ आहे. या काळात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले, भविष्याची जाणीव करून दिली तर तो निश्चितच जीवनात यशस्वी होतो. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी मैत्रीचे नाते ठेवून मार्गदर्शन करावे तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बरोबरच पालक, सहकारी व वरिष्ठ यांच्याशी मैत्रीचे नाते निर्माण करावे. असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी व्यक्त्त केले. ते तेथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजना, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी हेरिटेज आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर सामंजस्य करार अंतर्गत एकदिवसीय शिक्षक व विद्यार्थी यांची व्यावसायिक नैतिकता या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. उत्तम पाटील यांनी केले.
दुसऱ्या सत्रात प्रा.डॉ.अरुण शिंदे म्हणाले विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात फक्त्त अभ्यास न करता महाविद्यालयातील विविध कार्यक्रमात, स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे या शिक्षण प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये विविध कौशल्य विकसित होतात. महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करते.
या चर्चासत्रासाठी चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे क्लस्टर मधील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर मधील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रो. नितीनकुमार कस्तुरे, रो. यतीराज भंडारी, रो. सुरेश रोजे , सीए नागनाथ बसुदे, प्रा.डॉ. सबिहा फरास, महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते आभार प्रा.डॉ. लता मोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. शंकर दळवी यांनी केले.