ताज्या घडामोडी
Trending

मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल मॅडम जि.प.नाशिक यांची लासलगावला भेट. लासलगाव…..

मुख्य संपादक राहुल वैराळ

आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल मॅडम यांनी लासलगाव विंचूर सह सोळा गाव पाणीपुरवठा जल शुद्धीकरण केंद्राला भेट देत पाणी शुद्धीकरणाबाबत समक्ष पाहणी केली.
लासलगाव शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पाटील बजरंगाची तालुका अध्यक्ष सुरज नाईक सामाजिक कार्यकर्ते विकास कोल्हे प्रवीण कदम यांनी नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांचेकडे लासलगाव सह विंचूर पाणीपुरवठा योजना दुरुस्ती बाबत कैफियत मांडली होती. त्यावर त्यांनी तात्काळ जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल यांना समस्या सोडवण्याबाबत सांगितले होते.
याबाबत आजच्या भेटी दरम्यान त्यांनी लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन पाणीपुरवठा समितीला तसेच अधिकाऱ्यांना शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा करण्याबाबत सूचना केल्या तसेच जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना नवीन पाईपलाईन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या.
आज मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सोळगाव योजनेच्या पाणीपुरवठ्याच्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागात आढावा घेतला. तसेच पाणी शुद्धीकरणाबाबत असलेल्या त्रुटी दूर करण्याच्या पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या.तसेच लासलगाव ग्रामपंचायत मध्ये आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड लाभार्थीना वाटप केले.यानंतर ग्रामपंचायत अभ्यासिकेला भेट दिली.तसेच विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मा मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल मॅडम यांचे समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी साहेब, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा श्री जी.आर .भंडारी साहेब, मा. गटविकास अधिकारी श्री संदीप कराड साहेब, एमजीपीचे महाराष्ट्र प्राधिकरण श्री आर एल पाटील साहेब, पंचायत समितीचे उपअभियंता श्री शरद मिश्री साहेब ,तसेच शाखा अभियंता रावसाहेब वाघ,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्री कोशिरे ,विस्ताराधिकारी जनार्दन सोनवणे ,सुहास शिंदे बैठकीस होते.
यावेळी सरपंच जयदत्त होळकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील ,उपसरपंच रामनाथ शेजवळ, बजरंग दल तालुका अध्यक्ष सुरज नाईक, विकास समितीचे राजेंद्र कराड ,संदीप उगले सोमनाथ गांगुर्डे यांचे सह ग्रामसेवक शरद पाटील, जी. टी. खैरनार ,अतुल आढाव, भाऊसाहेब उबाळे, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी प्रफुल कुलकर्णी, पवन सानप व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.