सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या
सिन्नर प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड या स्मारकाचे व त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. दोन एकरांच्या तळ्यात गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन केले होते. या भूमिपूजनास चार वर्षे पूर्ण झाली असून, या तळ्यात साठवणीचे पाणी होते. त्यालाच आकर्षक रुप देण्यात आले आहे. या कामासाठी दोन एकरच्या परिसरामध्ये चारशे मोटरचा जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. तळ्याच्या मध्यभागी गोपीनाथ मुंडे यांचा 16 फूट उंचीचा ब्रांझचा पूर्णाकृती पुतळा मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील विजय बोनदर यांनी तयार केला आहे.
यावेळी खा. प्रितम मुंडे, खा. हेमंत गोडसे, आमदार अॅड. माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, अॅड. हेमंत धात्रक, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शीतल सांगळे, हेमंत धात्रक कार्यक्रमाचे आयोजक उदय सांगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.