
रूकडी -आपल्या संस्कृतीत मौखिक परंपरा पासून किंवा त्या आधीपासून आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड ज्ञान आहे या ज्ञानाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे आज परीक्षा केंद्रित शिक्षण व्यवस्थेमुळे मूल्य व्यवस्था ढासळत चालली आहेत. नेते आणि अभिनेत्यांना आदर्श मानणारी सेल्फी स्टिक पिढी निर्माण होत आहे. त्यामुळे वाचक वर्गाचे अवकाश कमी होत चालली आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून उलट्याचं सुलट करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. .असे मत साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत यांनी व्यक्त केली. ते रुकडीतील दुसऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनचे अध्यक्ष म्हणून बोलत होते
या संमेलनाचे उद्घाटक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर प्रा. डॉ. रणधीर शिंदे म्हणाले की साहित्यिक व सांस्कृतिक वारसा जतन करणे काळाची गरज आहे. आधुनिक युगात मूल्य संस्कार रुजून समाजाचा अंतरंग विकसित करण्यासाठी श्रोता वाचक व साहित्यिक यांचा सुसंवाद साधला पाहिजे.
स्वागत व प्रस्ताविक संमेलनाचे संयोजक डॉ सनतकुमार खोत म्हणाले या साहित्य संमेलनाचे आयोजन “ग्रामीण भागातील नवोदित लेखक कवी साहित्यिक यांना वैचारिक मंच देण्यासाठी केले आहे
दुसऱ्या सत्रात “नाती हरवत चाललेली कुटुंबव्यवस्था” या परिसंवादामध्ये अध्यक्ष प्राचार्य विराट गिरी म्हणाले की आजच्या पिढीने जुन्या पिढीशी तुलना न करता प्रेमाने व विश्वासाने नात्यांमध्ये सुसंवाद साधल्यास नाती उसवणार नाहीत. कुटुंबातील कर्ता हा कार्यक्षम असेल तर नाती हरवण्याची वेळ येणार नाही.यावेळी प्रमुख उपस्थिती माधुरी मगदूम व संजय पाटील यांनी आपले विचार मांडले.
तिसऱ्या सत्रात कथाकथनकार जयवंत आवटे यांचे विनोदी पण तितकेच हृदयस्पर्शी कथाकथन झाले.
यावेळी ग्रंथदिंडी उद्घाटक एकनाथ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी गावातील प्रमुख रस्त्या वरुन काढण्यात आली तसेच प.पु साने गुरुजी प्रवेशदराचे उद्घाटन सचिन खोत यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते संपादक प्रा.डॉ. खंडेराव शिंदे यांचा रुकडी ग्रामीण मराठी साहित्य विशेषांक प्रकाशित करण्यात आला. यावेळी कुमारी अक्षरा जयकुमार पाटील हिला विद्यार्थी वाचक पुरस्कार तसेच संदीप बिडकर व प्रशांत भोसले यांना पुरस्कार वितरण करण्यात आला .
चौथे सत्रामध्ये ज्येष्ठ कवी आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उमेश सुतार, क्षितिजा कुलकर्णी ,दीपक पवार, दीपक गायकवाड, संजयकुमार खाडे ,संदीप व्हनाळे,सतीश देसाई, राम चट्टे, सरिता मोरे ,अर्चना सुतार, संजय वारके, प्रशांत भोसले या कवी व कवयित्री नी कविता सादर केल्या.
यावेळी या सरपंच राजश्री रुकडीकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापिका पद्मजा पाटील संस्थापक सचिव सचिन आंबी उद्योजक इकलास पटेल,पोलीस पाटील कविता कांबळे, संभाजी भोसले, प्राचार्य सदाशिव भोसले आधार फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संदीप बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप व्हनाळे, संजय वारके तर या कार्यक्रमाचे आभार सरोजिनी खोत यांनी मानले.