ताज्या घडामोडी

लासलगावला महिलेची गळफास लावून आत्महत्या March 15, 2023

 

लासलगावला महिलेची गळफास लावून आत्महत्या
March 15, 2023ī

लासलगाव येथील अंबिका नगर येथे भाडेतत्त्वाच्या घरात राहणाऱ्या चाळीस वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली.या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
शौकत रसुल पठाण रा आंबीका नगर लासालगांव यांनी लासालगांव पोलीस स्टेशनला खबर दिली की,आमच्या घरात शितल रामभाऊ तळवाडे,वय ४० वर्ष रा नैताळे,ता निफाड हि महीला भाडेतत्वावर राहते तीचा दरवाजा बंद आहे व तीने घराचे पञ्याच्या खाली असलेल्या लोखंडी पाईपला साडी बांधुन त्या साडीने गळफास घेतला आहे अशी माहिती दिली. सदर माहिती मिळताच लासालगांव पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांचे सह पोलीस उप निरीक्षक देविदास लाड,महिला पोलीस अंमलदार शारदा कदम,पोलीस अंमलदार प्रदीप आजगे व गणेश बागुल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वरीष्टांच्या आदेशान्वये तपासाच्या दृष्टीने सबळ पुरावा हस्तगत करण्यासाठी पोलीस अंमलदार प्रदिप आजगे यांनी सदर मयत महिलेने गळफास घेतल्याचे फोटो काढून पोलीस उप निरीक्षक देविदास लाड यांनी घटनास्थळ पंचनामा करून प्रेत खाली उतरवुन घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी निफाड शासकीय रुग्णालयात पाठविले.डाॅक्टरांनी शवविच्छेदन केल्यावर सदर महिलेचे प्रेत अंत्यविधी साठी तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या प्रकरणी सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे आदेशानुसार सदर अकस्मात मृत्यु ची चौकशी पोलीस उप निरीक्षक देविदास लाड हे करीत आहे

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.