
नासिक – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल उद्या दिनांक 21/ 5 /2024 ला जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे . मंगळवारी 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे . अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे .त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती .बारावीच्या परीक्षेसाठी पंधरा लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळातर्फे आयोजित करण्यात आली होती.मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार उद्या दुपारी जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर , छत्रपती संभाजी नगर, मुंबई ,कोल्हापूर ,अमरावती , नाशिक, लातूर, व कोकण या नऊ विभागात मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक 21/ 5 /2024 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
*अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.*
1) mahresult.nic.in
2)http://hscresult.mkcl.oeg
3)www.mahahsscboard.in
4)https://results.digilocker.gov.in
http://results.targetpublication.org
*डीजी लॉकर मध्ये गुणपत्रिका संग्रहित करता येणार*
परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट आऊट घेता येईल त्याचप्रमाणे डीजी लॉकर ॲप मध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहेww.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकाला सोबत निकालाबाबदची इतर माहिती ऊपलब्द होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रीत निकाल ऊपलब्द होईल.