शेतकऱ्यावर पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज केला याच्या निषेधार्थ लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करून तहसीलदार यांना निवेदन
मुख्य संपादक राहुल वैराळ

लोणार:-15 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यावर पोलिसांनी हा अमानुष लाठीचार्ज केला याचा निषेध लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोणारचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
भाजपा सरकारच्या काळात खते, बि-बियाणे, डिझेल महाग झाल्याने शेती करणे परवडत नाही. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे नुकसान झाले, त्याची नुकसान भरपाई मिळावी, पिक विम्याचे पैसे मिळावेत, कापूस, सोयाबीनला योग्य भाव मिळावा या मागण्यांसाठी शेतकरी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. पण पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबले. या दडप शाही च्या निषेधार्थ बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ. *राहुलभाउ बोंद्रे* यांच्या सुचनेनुसार आज लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी, शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद, यांच्या नेतृत्वात दिनांक 15 फेब्रुवारी रोजी १२:३० लोणार तहसिल वर निषेध आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
लोणार तहसील चे नायब तहसीलदार परळीकर मॅडम यांना निवेदन देण्यात आले यावेळी लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष शेख समद शेख अहमद, सेवा दलाचे प्रदेशचे प्रकाश धुमाळ,ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, ज्येष्ठकाँग्रेस नेते शांतीलाल गुगलीया, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी,उपाध्यक्ष नगर परिषद बादशाह खान, गटनेते भूषण मापारी, माजी नगर सेवक शेख करामात,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तोफिक कुरेशी, आरोग्य सभापती संतोष मापारी, नगरसेवक शेख रउप भाई, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिभडे, ओबीसी से माजी नगरसेवक शहराध्यक्ष अंबादास इंगळे, माझी नगरसेवक पंढरी चाटे, माजी नगरसेवक असलम भाई, NSUI जिल्हा सरचितनीस शेख जुनेद शेख करामात , मनीष पाटोळे, ओम पाटोळे, अनिल पाटोळे, आप्पा रामा शिंदे, गजानन गीते, आनंद पाटोळे, गजानन बाजाड, केशव बाजाड, काँग्रेस कमिटीचे व सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते