
लासलगाव-: नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला.
सुरुवातीला २६/११/२००८ रोजी झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी यांच्या सह १९७ नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, व्यावसायिक विभाग समन्वयक प्रा.सुभाष रोटे, प्रा.श्रीराम कंधारे ग्रंथपाल गुरुदेव गांगुर्डे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधानाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रभाकर गांगुर्डे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सुनिल गायकर यांनी करून दिला. प्रा.किशोर गोसावी यांनी संविधानाचे सामूहिक वाचन केले. याप्रसंगी राज्यशास्त्र विभागाचे प्रा.श्रीराम कंधारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी संविधानाचे तत्वे समजावून सांगितले. प्रा.महेश होळकर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन संविधान विषयक विविध घोषणा दिल्या. तसेच संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वीेतेसाठी उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, प्रा.प्रभाकर गांगुर्डे, राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर कार्यक्रम अधिकारी प्रा.देवेंद्र भांडे व प्रा. सुनिल गायकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक यांनी प्रयत्न केले.