
सुरगाणा तालुक्यातील चपावाडी ह्या गावचे रहिवाशी श्री आनंदा धणजी गायकवाड हे गेल्या कित्येक वर्षापासून शेती करतात चापावाडी या गावचे शेतकरी गेल्या 1971 ते 1972 सालापासून शेती कसत असताना एक दिवस अचानक गावचा गावगुंड कमदू देवराम वाघमारे या व्यक्तीने त्यांच्या शेतात अतिक्रमण केले त्यांनी वेळोवेळी गावच्या सरपंचांना सांगितले गाव कमिटी बसवली कुठल्याही प्रकारचे प्रतिउत्तर न देता सदर व्यक्तीने डायरेक्ट जमीन सोडणार नाही तुम्हाला जे करता येईल ते करा अशा प्रकारे दादागिरी ची भाषा वापरली आहे काठीपाडा या गावांमध्ये सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांनी एक भेट दिल्यानंतर ही अडचणीत असलेली व्यक्ती यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही कळवण या ठिकाणी येऊन भेटा तलाठी आणि बिडिओ यांना यांना निवेदन द्यायला लावले ते त्यांनी दिले दिनांक 26 जुलै 2023 रोजी सहाय्यक जिल्हा अधिकारी व प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे एक निवेदन पत्र दिले असता त्यावर त्यांनी आश्वासन दिले आहे की सात ते आठ दिवसात याची माहिती कळवू आणि अतिक्रमण धारक जर चुकीचा आढळल्यास त्याला जमिनीतून बाहेर काढू व गुन्हा दाखल करु व आपणास योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू