स्वराज्य संघटनेच्या नासिक ग्रामीण जिल्हाप्रमुख पदी टाकळी विंचूर येथील सामाजिक कार्यकर्ते

स्वराज्य संघटनेच्या नासिक ग्रामीण जिल्हाप्रमुख पदी टाकळी विंचूर येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वैराळ यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना याबाबतचे नियुक्तीचे पत्र छत्रपती संभाजी महाराज व संघटनेचे राज्य प्रवर्क्ते करण गायकर यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या संघटनेच्या कार्यक्रमात देण्यात आले तसेच निफाड उप तालुकाप्रमुख पदी प्रदीप रायते लासलगाव उप शहर प्रमुख पदी रोहिदास पवार यांची देखील नियुक्ती करण्यात आली शेती शेतकरी शिक्षण सहकार कामगार आणि आरोग्य ही पंचसूत्री केंद्रस्थानी ठेवून राज्यातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने सरकारवर दबाव आणण्यासाठी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांचे आदेशाने स्वराज्य संघटनेचा शाखा विस्तार सुरू असल्याचे करण गायकर यांनी यावेळी सांगितले नवनाथ वैराळ प्रदीप रायते रोहिदास पवार यांची निवड झाल्याबद्दल टाकळी विंचूर पंचक्रोशीतील व तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले
चौकट.. छत्रपती संभाजी महाराज यांनी माझी नासिक जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती केली त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाने मी स्वतः गावोगावी जाऊन सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन संघटना विस्तारासाठी प्रयत्न करीन
नवनाथ वैराळ जिल्हाप्रमुख