
कोटमगाव येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिरात गंगा पूजन करून शिवलिंगास स्नान घालून महापूजा आरती झाली चिरंजीव सोहम जयवंत भालेराव यांने शिव शंकर भगवान यांचा वेश धारण करून रथयात्रा गावात मिरवणूक काढण्यात आली व भगवान एकलव्य जयंती साजरी करण्यात आली. हे यानंतर कोटमगावचे उपसरपंच श्री योगेश पवार वक्रतुंड कन्ट्रक्शन चे प्रोप्रायटर श्री विनायक पवार महावीर विद्यालयत कार्यरत असलेले शिक्षक श्री . विलास पवार यांनी खिचडी वाटप केले तसेच श्री .संदीप गवारे श्री. रुपेश शिरसाठ यांनी खजुर वाटण्यात आली कोटमगाव शिवभक्तांतर्फे बहुरूपी बाबा आश्रम लासलगाव यांना खजूरीचे पाकीट देण्यात आली या आनंदप्रसंगी कोटमगावचे शिवभक्त. वारकरी संप्रदाय. सर्व धर्मातील ग्रामस्थ. कोटमगावतील आजी-माजी सरपंच उपसरपंच ,चेअरमन व्हाय चेअरमन. तंटामुक्ती अध्यक्ष ,सर्व मित्र मंडळ, सामाजिक कार्यकर्ते बचत गटातील कर्मचारी, सोसायटी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी. उपस्थित होते अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे राजकारण. भाऊबंदकी. अंतस्तवाद. विसरून सार्वजनिक उत्साहात सहभाग दाखवाव.