ताज्या घडामोडी
भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले खडक माळेगावचे भूमिपुत्र श्री. योगेश शिंदे यांचा अपघाती मृत्यू
श्री. ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की, भारतीय सैन्य दलात राजस्थान येथे कार्यरत असलेले निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील मेजर श्री. योगेश सुखदेव शिंदे हे शेतकरी राजाचा बैल पोळा सणाच्या दिवशी घरी आले होते. दुसऱ्या दिवशी दिनांक 15-9-2023 रोजी काही कामानिमित्त वनसगाव रोडवर गाडीवर प्रवास करत असताना पिकअपने समोरासमोर धडक देऊन मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात आई ,वडील ,पत्नी ,मुलगा, भाऊ भावजई असा परिवार आहे . त्यानंतर त्यांचा मृतदेह देवळाली येथे रात्री हलवण्यात आला आहे. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आज दिनांक 16-9-2023 रोजी दुपारी 4 वाजता खडक माळेगाव येथे शासकिय इंतमात करण्यात येणार आहे. मेजर श्री. योगेश शिंदे यांच्या अपघाती निधनाने खडक माळेगाव , परिसरात गावांमध्ये शोककळा पसरली आहे