मंगरुळ गावात 13 वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये अडकून मृत्यू
ज्ञानेश्वर पोटे

चांदवड तालुक्यातील चांदवड शहरा नजीक असलेल्या मंगरूळ गावात मंगरुळ– भरवीर रस्त्यालगत सरदारजींची गुरुद्वारा आहे. गुरुद्वाराच्या पाठीमागे अमृतसिंह बेदी यांची शेतजमीन असून त्या शेतीमध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर चे काम चालू असताना अमृतसिंह बेदी यांचा 13 वर्षीय मुलगा परमबीर सिंग बेदी हा रोटावेटर वर बसलेला असताना ट्रॅक्टरच्या हालचाली मध्ये त्याचा तोल जाऊन तो रोटावेटर च्या पुढील बाजूस पडल्याने त्याच्या शरीराचे कमरापासून खालील भाग संपूर्ण रोटावेटर मध्ये अडकल्याने चक्काचूर झाला. ट्रॅक्टर चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने ट्रॅक्टर थांबवून स्थानिकांच्या मदतीने परमबीर सिंग बेदीला चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले,पण तेथील डॉक्टरांनी परमबीरला तपासांती मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.