
ज दिनांक ३जानेवारी २०२३ तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा सरस्वती विद्यालय निफाड येथे उत्साहात पार पडल्या.यात वैयक्तिक नृत्य लहान गट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता तिसरीची विद्यार्थीनी कुमारी श्रावणी दिपक निरभवणे हिने प्रथम क्रमांक मिळविला.नाशिक जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.भगवान फुलारी साहेब तसेच निफाड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.तुंगार साहेब ,लासलगाव बिटाचे शिक्षणविस्ताराधिकारी मा.गायकवाड साहेब व इतर मान्यावर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.कुमारी श्रावणी हिला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम वाघ मॕडम तसेच श्रीम गोसावी मॕडम,लायरे मॕडम,गवळी मॕडम,पल्हाळे मॕडम,धामणे सर यांचे मार्गदर्शन लाभले.