ताज्या घडामोडी

चांदवड तालुक्यातील रापली गावातून पाच वर्षाचा लहान मुलगा बेपत्ता….

ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- चांदवड तालुक्यातील मनमाड लगतच असलेले मौजे रापली येथून कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर वय वर्षे 5 हा मुलगा काल दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता आहे. सदर घटनेची दखल घेऊन काल संध्याकाळी 6 वाजे पासून पोलीस प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न केले.रात्री मनमाडचे DYSP श्री.बाजीराव महाजन व चांदवडचे PI श्री.कैलास वाघ साहेब रापली गावात मुक्काम ठोकून रात्रभर तपास कार्य चालू होतं. गावातील तरुण मुलांनी संपूर्ण परिसर पिंजून काढून,गावातील बऱ्याच विहिरीचे पाणी काढून बघण्यात आले. आज सकाळी तपास कामी नाशिकचे SP श्री.विक्रम देशमाने साहेब,मालेगांवचे Additional SP भारती अनिकेत साहेब,

DYSP श्री.बाजीराव महाजन साहेब,चांदवडचे PI श्री.कैलास वाघ साहेब,मनमाडचे PI श्री.खरे साहेब,तसेच

येवला पोलीस स्टेशन यांनी परिसराची कसून तपासणी केली व मुलाचा लवकरच शोध लागेल असे त्यांनी सांगितले. त्यावेळेस प्रहारचे जिल्हा प्रमुख श्री.गणेशभाऊ निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते श्री.भागवतभाऊ झाल्टे यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली.संघरत्न संसारे व गावातील इतर युवा तरुण मित्रांचे रात्रीपासून मोठ्या प्रमाणात परिसरात शोधकार्य सुरू आहे.रात्रीपासून

हे सर्व तपास कार्य करून एक आई-वडिलांचे लहानसं बाळ त्यांना लवकरात लवकर मिळावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना. या सर्व तपास कार्यात लहान ऋष्णा बिडगर नामक मुलाचा शोध घेणारे प्रत्येक पोलिस अधिकारी,कर्मचारी आपल्या परीने प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.

या तपासकार्यात पोलीस प्रशासनाचे मोलाचे व गावातील तरुण युवकांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.