
निफाड तालुक्यामध्ये अक्षरशा पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावी लागते वणवण या महिलां मध्ये लहान मुले सुद्धा मे महिन्याच्या कडक उन्हात मध्ये पायी अनवाणी फिरून पाणी कुठे मिळेल याचा शोध घेत आहे अशी बिकट परिस्थिती सध्या निफाड तालुक्यातील
पालखेड ,कुंभारी, पचंकेश्वर , रानवड, नांदुर्डी, पालखेड परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. विहिरी व हातपंप आटायला लागले आहेत. त्यामुळे पिण्यासाठी महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. सर्व गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामपंचायत मालकीच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत कामे सोडून पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करत आहे. तसेच 16 गाव योजनेची पाईप लाईन कायम ना दुरुस्ती असते त्यामुळे महिलांमध्ये व गावातील ग्रामस्थ मध्ये अक्षरशः संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे लोक प्रतिनिधी फक्त बघायची भूमिका घेत आहेत ग्रामपंचायत सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे पाणी नेमकी मागायचे कोणाकडे असा प्रश्न आता महिलांना व परिसरातील नागरिकांना पडलेला आहे तसेच अनेक गावातील व परिसरातील शेतजमिनीचे क्षेत्र पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर अवलंबून असल्याने शेतकरी पाणी केव्हा येणार, या प्रतीक्षेत असून, लवकरात लवकर पालखेड धरणातून आवर्तनाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी व महिलांकडून होत आहे. कुंभारीसह परिसरातील गावांमध्ये पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. दैनंदिन कामे सोडून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे, असे निफाड तालुका भाजप उपाध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.