सुरत – पॅसेंजर मध्ये प्रवाशाला मारण करीत लुटले; जळगावातील त्रिकूट जाळ्यात

नंदुरबार लोहमार्ग पोलिसांनी पाळधी जळगाव दरम्यान सुरत-भुसावळ पॅसेंजर मध्ये प्रवासी प्रकाश वामन पाटील, ( वय-४३) रा. वेलसवाडी ता. मुक्ताईनगर जि. जळगाव, यांना मारण करीत लुटल्याची घटना घडली आहेत. अधिक माहिती अशी की, संशयित जुबेर उर्फ डबल शेख भिकन (वय-२२) रा. गेंदालाल मिल जळगाव, व तनवीर उर्फ तन्नु रहीम शेख, (वय-२१) रा. शिवाजीनगर जळगाव, फारूक शाह नूर मोहम्मद फकीर, (वर-२२) रा. दूध फेडरेशन जळगाव, अशी अटकेतील आरोपींचे नाव आहेत. आरोपींकडून १७ हजार रुपये रोख आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सेंट्रल बँक चे एटीएम कार्ड, मतदान कार्ड, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दरम्यान टोळीतील अन्य दोन साथीदारांच्या शोध सुरू करण्यात आला आहे.
गुन्हा अन्वेषण पथकातील एपीआय रमेश वावरे, संजय पाटील, किरण बोरसे, जयकुमार कोळी, नितीन पाटील, राजेश घोराडे, जितेंद्र चौधरी, तसेच भुसावळ लोहमार्ग निरीक्षक विजय घरेडे, एपीआय भाऊसाहेब मगर, जगदीश ठाकूर, अजित तडवी, धनराज लुले, दिवाणसिंग राजपूत, सागर खंडारे तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे अंमळनेर निरीक्षक कुमार श्रीकेश, कुलभूषणसिंग चव्हाण, नंदू पाटील सुभाषसिंग सीआयबी सुरतचे भुपसिंह मान, परेश ठाकूर, आदींनी आरोपींना अटक केली.