रापली गावातील बेपत्ता पाच वर्षीय कृष्णा बिडगरचा मृतदेह अखेर दुसऱ्या दिवशी सापडला घरा शेजारील विहिरीत
ज्ञानेश्वर पोटे

रापली दिनांक ०१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक बेपत्ता झालेल्या कृष्णाचा मृतदेह त्याच्याच घराजवळच्या विहिरीत दुसऱ्या दिवशी दिनांक ०२ सप्टेंबरला संध्याकाळी तपास कार्य चालू असताना आढळून आला.
सदर मृतदेह हा श्री.ज्ञानेश्वर शिवाजी बिडगर यांच्या स्वतःच्या १० परस विहिरीत संध्याकाळी 7:15 वाजता आढळून आला असून हा घात की अपघात याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नसून पोलीस तपास करत आहे. गावातील तरुण,ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाने सदर बालकाचा सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेही आढळून आला नाही.परिसरातील विहिरीतील पाणी काढून, खाली उतरून देखील बालकाचा थांगपत्ता लागत नसल्याने बालकाचे अपहरण तर करण्यात आले नाही ना?अशी शंका उपस्थित केली जात होती. सदर मुलाचा शोध घेण्यासाठी डॉगस्कॉर्डची मदत घेण्यात आली. अखेर डॉगस्कॉर्डने घराजवळील विहिरीकडचा माग दाखवल्याने पोलीस प्रशासनासह सर्वांनी मदत कार्य राबवून सदर विहिरीतील पाण्याचा तात्काळ उपसा करून सदर मुलाचा मृतदेह 7:50 ला सामाजिक कार्यकर्ते,युवा क्रांती फाउंडेशन पोलीस मित्र ग्राहक को पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष हे स्वतः धाडसी वृत्ती असलेले श्री.भागवत झाल्टे यांनी दहा परस विहिरीत उतरून हा मृतदेह काढला. त्यावेळेस मनमाड DYSP श्री.बाजीराव महाजन साहेब, चांदवड पोलीस स्टेशनचे PI श्री.कैलास वाघ साहेब तसेच येवला, मनमाड, परिसरातील पोलीस यंत्रणा सज्ज होती. त्यावेळेस विहिरीची खोली बघता विहिरीत उतरण्यासाठी कोणी धाडस करत नव्हते, तेव्हा सामाजिक कार्यकर्ते श्री.भागवत झाल्टे यांनी स्वतः दहा परस विहिरीत उतरून जीवाची पर्वा न करता एका हाताने बालकाचा मृतदेह विहिरी बाहेर काढला.या वेळी कृष्णाच्या आई वडिलांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची सर्व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला असून, सदर घटना घात की अपघात या बाबत काही माहिती मिळाली नसून या घटनेचा चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चांदवड पोलीस करत आहे. श्री.भागवत झाल्टे यांच्या या धाडसी कामगिरी करता सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.