दोघा मित्रांनी स्वतः भावपूर्ण श्रद्धांजली चे स्टेटस ठेवले अन नंतर सुपरफास्ट एक्सप्रेस समोर स्वतःला झोकून दिले.
नाशिक प्रतिनिधी

नाशिक – चेहडी पंपिंग गीते मळ्यात असलेल्या म्हसोबा नगरात राहणारे सचिन दिलीप करवर( 17 )संकेत कैलास राठोड (17 )हे दोन्ही बालपणचे मित्र होते, या दोघांची मैत्री सख्या भावासारखी असून ते मित्र नव्हे तर अनेकांना सख्खे भाऊच वाटायचे, अचानक त्यांच्या मनात काय विचार आला कोणास ठाऊक आणि दोघांनी एकदम टोकाचा निर्णय घेतला शनिवार दिनांक 8 सायंकाळी स्वतःच्या व्हाट्सअप क्रमांकाच्या स्टेटस वर भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट अपलोड केली. त्यानंतर दोघेही वालदेवी नदी जवडून जाणार्या रेल्वे रुळावर गेले आणि एका सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे पुढे स्वतःला झोकून देत जीवन प्रवास कायमचा संपविला. त्यामुळे करवर व राठोड कुटुंबीयांवर आभाळ फाटले घटनेची माहिती मसोबा नगर परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण परिसर एकाएकी सुन्न झाला . दोघांच्या घराबाहेर नागरिकांची एकच गर्दी केली होती. दोघांच्या आत्महत्येची नेमकी कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेली नाही . याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे .रविवारी दुपारी नाशिक रोड येथील देवळाली गाव स्मशानभूमी दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.