
सविस्तर वृत्त असे की, निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शेतकरी श्री. भगीरथ निवृत्ती रायते मु.पो. खडक माळेगाव ता. निफाड जि. नासिक या शेतकऱ्यांचे ,टाकळी ( विंचूर) शिवारात गट क्रमांक ८४२ या क्षेत्रात द्राक्षाचे तीन बिगे क्षेत्रात लागवड केली होती फक्त २ दिवसात विक्री करणार होती दिनांक ९.४.२०२३ रविवार रोजी सायंकाळी ७.३०ते ८.३० वाजता अचानक ढगांच्या गडगडासह वादळी गारांचा पाऊस, त्या पावसामुळे आधीच अतिवृष्टीच्या तडाख्यातून कसा बसा सावरून शासकीय अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबारा अस्मानी संकट आली आणि काही क्षणात व होत्याचे नव्हते झाले . अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे श्री भगीरथ निवृत्ती रायते यांचे द्राक्ष बाग संपूर्ण भुईसपाट झाला पीके खराब झाले 40 ते 45 रुपये कीलोने मागितलेली द्राक्ष मातीमोल झाले यात ८ ते १० लाखाची नुकसान झाले. तरी लोकप्रतिनिधींनी तात्काळ दाखल घेऊन कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश द्यावे व आर्थिक मदत करावी. यावेळी शेतकरी म्हटले की घेतलेले पीक कर्ज माफ करावे. बँकांनी शेतकऱ्यांची झालेले नुकसानीचा विचार करून मध्य मुदतीच्या कर्जात सवलत देऊन हप्ते स्वरूपात कर्जाची मागणी करावी अन्यथा शेतकऱ्याला आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे